
मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने महिलांना लक्ष्य करून मारले जाणारे फुगे आणि अश्लील वर्तन रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग फेकणे, साध्या, रंगीत पाण्याने अथवा कुठल्याची द्रवाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फेकणे त्याचप्रमाणे अश्लील शब्द, घोषणा, गाणी उच्चारणे, कोणाचीही प्रतिष्ठा दुखावेल अशा प्रकारचे हावभाव करणे, जातीय तणाव रोखण्यासाठी १२ ते १८ मार्च या कालावधीसाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येईल, असे पत्रक उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी जारी केले आहे.