'कुछ मीठा हो जाए'; गृहिणी अनन्या टिकम यांच्या शाही, पानगुलकंद चॉकलेट्सना सर्वाधिक मागणी

यंदा बहुतांश ग्राहकांनी दुकानांत जात गोडधोड खरेदी करण्यापेक्षा घरगुती पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या चॉकलेट्स, केक तसेच बर्फीना पसंती दिली आहे
'कुछ मीठा हो जाए'; गृहिणी अनन्या टिकम यांच्या शाही, पानगुलकंद चॉकलेट्सना सर्वाधिक मागणी

श्रावण महिन्याला सुरुवात झाली की एकामागोमाग एक सणांना सुरुवात होते. या महिन्यातील महत्त्वाचा आणि तितकाच पवित्र सण म्हणून ओळखला जाणारा रक्षाबंधन येत्या ११ ऑगस्टला घरोघरी उत्साहात साजरा होणार आहे. हाच उत्सव गोडधोड होण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे चॉकलेट्स पॅकेट, बर्फी-पेढे विक्रीसाठी आहेत. मात्र यंदा बहुतांश ग्राहकांनी दुकानांत जात गोडधोड खरेदी करण्यापेक्षा घरगुती पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या चॉकलेट्स, केक तसेच बर्फीना पसंती दिली आहे. रक्षाबंधनाला 'कुछ मीठा हो जाए' असे म्हणत नेहमीचे चॉकलेट्स देण्याऐवजी त्यामध्ये चॉकलेट आणि पंचखाद्याची गोडी देण्याचा प्रयत्न कांदिवली येथील गृहिणी अनन्या टिकम यांनी केला आहे. चॉकलेट्समध्ये विविध मिष्टान्नांचा समावेश करून त्याला एक वेगळी गोडी देण्याचा प्रयत्न मागील दोन वर्षांपासून गृहिणी अनन्या टिकम करत आहेत. विविध प्रकारच्या चॉकलेट्सना ग्राहकांकडून यंदाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे टिकम यांनी सांगितले.

बहिण-भावाच्या नात्यात रक्षाबंधन या दिवसाला विशेष महत्त्व आहे. एकमेकांपासून दूर राहणारे बहीणभाऊ या दिवशी एकमेकांच्या भेटीगाठी करतात. गोडधोड सेलिब्रेशन करत आयुष्यभर एकमेकांची काळजी घेण्याचे वचन एकमेकांना देतात. या सणाच्या दिवशी बहिणींचे हट्ट पुरवण्यास सर्वच भाऊ बांधील असतात. अनेकवेळेस आवडते गिफ्ट देऊनही चॉकलेट्स हवे असल्याची मागणी बहिणींकडून केली जाते. याच पार्श्वभूमीवर सध्या बाजारात विविध प्रकारचे चॉकलेट्स, मिठाई, गिफ्ट्स विक्रीसाठी दाखल झाले आहेत. परंतु कोरोनापासून बाहेरचे बनवून ठेवलेले खाद्य खाण्यासाठी ग्राहक सातला असुरक्षित मानतात. या अनुषंगाने घरगुती, महिला बचत गटाच्या माध्यमातून बनवण्यात येणाऱ्या पदार्थाना, विविध खाद्यपदार्थाना सर्वाधिक मागणी असते. कांदिवली येथे राहत असलेल्या गृहिणी अनन्या टिकम यांनी हीच बाब लक्षात घेत कोरोनापासून राहत्या घरीच विविध प्रकारचे केक, चॉकलेट्स, मोदक बनवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या पदार्थाना आजूबाजूच्या परिसरासह ऑनलाईन देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यंदा देखील रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर खोबर, खारीक, खडीसाखर, खसखस अशा मिष्टानांचा समावेश करत चॉकलेटस करण्यास त्यांनी सुरुवात केली. ग्राहकाचा वाढता प्रतिसाद पाहता त्यांनी यामध्ये नवनवीन कल्पना जोडत घरगुती चॉकलेट्स ग्राहकांच्या आणखी पसंतीस पाडण्याचा अनोखा प्रयोग त्यांनी केला आहे. दरम्यान, हे चॉकलेट्स खाण्यास मध्यम गोड आणि जिभेवर ठेवताच लगेच विरघळणारे आणि मधुर अशी चॉकलेट चव देणारे असल्याने लहान मुलांनाही या चोक्लेट्सची भुरळ पडल्याची टिकम यांनी सांगितले.

शाही, पाणगुलकंद, रसमलाई चॉकलेट्सची चवच भारी!

साधारण चॉकलेट्स आणि घरी बनवलेल्या चोक्लेट्समध्ये आणि त्यांच्या चवीत फार फरक पडतो. वाढत्या ट्रेंडमुळे राहत्या घरीच अनेक महिला केक, चॉकलेट्स बनवू लागले आहेत. मात्र कांदिवलीच्या टाकं यांनी यामध्ये बदल करत ग्राहकांच्या चवीनुसार आणि आवडीनुसार विविध चॉकलेट्सचे प्रकार बनवण्यास सुरुवात केली. यामध्ये चॉकलेट्समध्ये त्यांनी पंचखाद्य, शाही, पान गुलकंद, कॉफी ट्रफल आदी प्रकार विक्रीस ठवेल आहेत. या विविध प्रकारांना ग्राहकांकडून विशेष मागणी असून ५ चॉकलेट्स, ११ चॉकलेट्स आणि २० चॉकलेट्सचा बॉक्स त्यांनी विक्रीसाठी ठेवला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in