बीकेसी येथील जंब्मो कोविड सेंटर मध्ये कोरोना योद्धांचा सन्मान

बीकेसी येथील जंब्मो कोविड सेंटर मध्ये कोरोना योद्धांचा सन्मान
Published on

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि कोरोना बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी बीकेसी येथे जंब्मो कोविड सेंटर सुरु करण्यात आले. जंब्मो कोविड सेंटर सुरु झाल्यापासून दोन वर्षांत तब्बल २६ हजार रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. तर ५ लाख लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली आहे. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना योद्धांचा जंब्मो कोविड सेंटरला दोन वर्षे पूर्ण झाल्याने गुरुवारी सन्मान करण्यात आला.

मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच संपूर्ण मुंबईत झपाट्याने रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे पालिकेच्या प्रमुख चार रुग्णालयांसह १६ उपरुग्णाये, कोविड सेंटरमधील बेड अपुरे पडू लागले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून केवळ १७ दिवसांत ‘बीकेसी’ जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in