हॉटेल बडेमियाचे किचन बंद अस्वच्छता, परवाना नसल्याने एफडीएची कारवाई 

हॉटेल व्यवस्थापकांकडे हॉटेल परवाना नसल्याचे समोर आले
हॉटेल बडेमियाचे किचन बंद अस्वच्छता, परवाना नसल्याने एफडीएची कारवाई 

मुंबई : आपण घेत असलेले अन्न हे सुरक्षित आहेत की नाही हे छोट्या बड्या हॉटेलवर अवलंबून नाही हे एफडीएच्या धाडीने समोर आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध कुलाब्याच्या बडे मिया हॉटेल एफडीएने धाड टाकली. आणि यात या हॉटेलच्या किचनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळली. तर हॉटेल व्यवस्थापकांकडे हॉटेल परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे या हॉटेलची किचन बंद करण्यात आली आहे.

किचनमध्ये झुरळे, उंदीर

बडेमियाच्या एकूण तीन आऊटलेट वर रात्री ८ वाजताच्या दरम्यान एफडीएच्या अन्न सुरक्षा निरीक्षकांच्या सहकार्याने धाड टाकली. काही तासांच्या छापेमारीत हॉटेलच्या किचनमध्ये झुरळे, उंदीर आणि अस्वच्छता आढळून आली. तर त्यांच्या एका हॉटेलच्या किचन्समध्ये फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाचे लायसन्स नसल्याचे आढळले. त्यामुळे ही किचन्स एफडीएकडून सील करण्यात आली; मात्र अन्य आउटलेट मात्र सुरू ठेवण्यात आल्याचे हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in