
बुधवारी वाशीमधील हॉटेलमध्ये एका खाजगी कंपनीच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तिकडे हिंदीसह इतर भाषेतील गाणी सुरु होती. त्यावेळी इव्हेंट ऑर्गनायझर आणि कंपनी कर्मचाऱ्यांनी मराठी गाणी वाजवण्याची विनंती हॉटेल कर्मचाऱ्याकडे केली. मात्र 'या हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजवण्यास बंदी आहे', असे त्यानी सांगितले. एवढेच नव्हे तर हॉटेल चालकालाही याबद्दल विनंती करण्यात आली.
हॉटेल चालकाला वारंवार विनंती करूनही मराठी गाणी वाजण्यास नकार दिला गेला. नकार दिल्याने संतप्त झाल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल चालकाला चोप दिल्याची घटना घडली. यासर्व घटनेनंतर हॉटेल संचालकांनी गैरसमजुतीमुळे हा प्रकार घडला असे सांगत दिलगिरी व्यक्त केली.