
मुंबई : विक्रोळी पूर्व येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडचा पत्रा कोसळला. या दुर्घटनेत राजेंद्र पासी (३५) यांचा मृत्यू झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विक्रोळी येथील कन्नमवार नगर २ येथे इमारत क्रमांक २ जवळ म्हाडाच्या इमारतीचा आदित्यराज कन्स्ट्रक्शनतर्फे पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पात गुरुवारी दुपारी १२.२० च्या सुमारास स्लॅबचा काही भाग सिमेंट, वाळू या सामग्रीसह भूमिगत पाण्याच्या टाकीवरील तात्पुरते शेड कोसळले. या दुर्घटनेत राजेंद्र फासी हा जखमी झाला होता. त्याला पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.