आता रेल्वेत मिळणार घरगुती वापराच्या वस्तू; डेक्कन, तेजससह चार गाड्यांची झाली निवड

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने यश्त कन्सल्टंट प्रा. लिमिटेडला गाड्या स्वच्छ करण्याचे कंत्राट दिले आहे.
आता रेल्वेत मिळणार घरगुती वापराच्या वस्तू; डेक्कन, तेजससह चार गाड्यांची झाली निवड

आपण रेल्वे प्रवास करत असताना खाण्यापिण्याशिवाय तेथे काहीच मिळत नाही. तुम्ही प्रवास करताना ब्रश, टुथपेस्ट, पावडर विसरलात तर ती गाडीत मिळत नाही. आता ही कमतरता रेल्वेने भरून काढली आहे. घरगुती रोजच्या वापराच्या वस्तू आता आपल्याला रेल्वेत मिळणार आहेत. या प्रयोगासाठी पहिल्या टप्प्यात चार गाड्यांची निवड करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने यश्त कन्सल्टंट प्रा. लिमिटेडला गाड्या स्वच्छ करण्याचे कंत्राट दिले आहे. आता त्यांना घरगुती वापराच्या वस्तू विकण्यास परवानगी दिली आहे. डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-करमाळी तेजस एक्स्प्रेस, मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये एका वर्षासाठी या वस्तू विक्रीची परवानगी दिली आहे. कंत्राटदार रेल्वे गाड्या या स्वच्छ ठेवणार आहे. त्यासाठी रेल्वेला वर्षाला ३५ लाख रुपये मोजणार आहे. यापूर्वी रेल्वेला गाड्यांमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी वर्षाला ४३ लाख रुपये लागत होते. या कंत्राटदाराला खाद्यपदार्थ, सिगारेट, गुटखा व दारूच्या बाटल्या विकता येणार नाहीत.

वस्तूंचे कॅटलॉग उपलब्ध

प्रवास सुरू झाल्यानंतर प्रवाशांना एक कॅटलॉग वितरित केले जाईल. त्यातून प्रवाशांना हवी ती वस्तू विकत घेता येऊ शकेल. या वस्तू पॅकबंद असतील, तसेच कर्मचारी युनिफॉर्ममध्ये असतील. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत माल विक्रीला परवानगी असेल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in