गृहनिर्माण सोसायट्यांना मिळणार कचरा पेटी

पालिका करणार १८ कोटी रुपये खर्च
गृहनिर्माण सोसायट्यांना मिळणार कचरा पेटी

मुंबई : शहर कचरामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा पेटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका १८ कोटी रुपये खर्चणार आहे.

मुंबई महापालिका ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर अनेक गृहनिर्माण सोसायटी आणि वस्त्यांमध्ये कचरा पेट्यांची मोठी समस्या निर्माण झाली. अनेक वस्त्यांमध्ये आजही कचरा पेट्या उपलब्ध नसल्याने गृहनिर्माण संस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अखेर या कचरा पेटी देण्याची तयारी विम प्लास्ट या कंपनीने दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्येक गृहनिर्माण संस्थांच्या मागणीनुसार या पेट्यांचे वाटप केले जाणार आहेत.

१ लाख २० हजार कचरा पेटींचा पुरवठा

या १ लाख २० हजार कचरा पेटींच्या पुरवठ्यासाठी निविदा प्रक्रियेत तीन गट बनवण्यात आले होते. या निविदा प्रक्रियेत विम प्लास्ट या कंपनीने १५८४.७१ रुपये एवढा दर दिला होता, तर दुसऱ्या दोन गटांमध्ये निलकमलने १५९३ रुपये आणि एरिस्ट्रॉप्लास्ट प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीने १५९८ एवढ्या दराची बोली लावली होती. अखेर १५८४ या कमी दर आकारल्याने विम प्लास्ट कंपनीला कचरा पेटी पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in