भारताकडे येणाऱ्या जहाजावर हुथींकडून हल्ला

येमेनमधील हुथी बंडखोरांनी तांबड्या समुद्रात मंगळवारी ग्रीक मालकीच्या, अमेरिकेतून भारताकडे येणाऱ्या जहाजावर 'स्टार नासिया' नावाच्या मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्रे डागून हल्ला केला.
भारताकडे येणाऱ्या जहाजावर हुथींकडून हल्ला

मुंबई : येमेनमधील हुथी बंडखोरांनी तांबड्या समुद्रात मंगळवारी ग्रीक मालकीच्या, अमेरिकेतून भारताकडे येणाऱ्या जहाजावर 'स्टार नासिया' नावाच्या मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्रे डागून हल्ला केला. येमेनमधील हुदैदा बंदराजवळ हा हल्ला झाला. त्यात 'स्टार नासिया'चे किरकोळ नुकसान झाले. जहाजावरील कर्मचाऱ्यांना कसलीही ईजा झाली नाही.

दुसऱ्या घटनेत, हुथी बंडखोरांनी येमेनच्या दक्षिणेकडील एडन बंदराजवळून 'मॉर्निंग टाइड' या ब्रिटनच्या मालवाहू जहाजावर तीन क्षेपणास्त्रे डागली. मात्र, त्या क्षेपणास्त्रांचा नेम चुकल्याने मोठे नुकसान टळले. इराण-समर्थित हुथी बंडखोरांचे लष्करी प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी एका निवेदनात दावा केला की, बंडखोर सैन्याने तांबड्या समुद्रात एक अमेरिकन आणि एक ब्रिटिश अशा दोन स्वतंत्र जहाजांवर हल्ला केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in