बाळासाहेबांच्या पुत्राला संकटसमयी एकटे सोडून कसे जाणार? शिवसेना खासदारांचा भावनिक सवाल

काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्या वळणावर आले आहे
बाळासाहेबांच्या पुत्राला संकटसमयी एकटे सोडून कसे जाणार? शिवसेना खासदारांचा भावनिक सवाल
Published on

निष्ठावान असलेले नेतेच बंड करून बाहेर पडल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला असताना उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावनिक ट्वीट करत आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच आहोत, असे स्पष्ट केले आहे. “जात, गोत्र अन धर्म आमचा शिवसेना. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्या वळणावर आले आहे. यात शिवसेनेच्या काही नेत्यांनी वेगळा निर्णय घेऊन आपल्याच काही सहकाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर घेऊन जाऊन पक्षश्रेष्ठींशी प्रतारणा केली आहे. यातील अनेक जण हे परत येऊ इच्छितात व या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये पहिले हिमतीचे काम केले ते माझे मित्र व सहकारी आमदार कैलास पाटील यांनी. सत्ता येत राहते व जात राहते, परंतु जे धैर्य व निष्ठा तुम्ही शिवसेना व आपल्या पक्ष प्रमुखांबद्दल दाखवली त्याची नोंद ही कायमस्वरूपी राजकीय इतिहासात झाली. आम्ही बाळासाहेबांना दैवत मानणारे त्यांच्याच पुत्राला या संकटसमयी एकटे सोडून कसे जाणार. आपण धाराशिवचा आमदार तर आहोतच पण सर्वप्रथम बाळासाहेबांचा मावळा आहे, हेच आमदार कैलास पाटील यांनी दाखविले,” असे निंबाळकर यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in