HSC Exam : 'कॉपीमुक्त अभियान' राबवूनही पेपरफुटी सुरूच; बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅप

बारावीचा (HSC Exam) इंग्रजीचा पेपर फुटल्याप्रकरणी ६ शिक्षकांना झाली अटक, परभणीतून आला प्रकार समोर
HSC Exam : 'कॉपीमुक्त अभियान' राबवूनही पेपरफुटी सुरूच; बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅप

कालपासून बारावीची (HSC Exam) परीक्षा राज्यभर सुरु झाली आहे. अशामध्ये राज्य मंडळाने 'कॉपीमुक्त अभियान' राबविण्यात येणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. असे असतानाही परभणीत इंग्रजीचा (English) पेपर फुटल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ६ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकदेखील करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे यवतमाळमधील एका शाळेतून परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच इंग्रजीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाला. यानंतर एका केंद्र प्रमुखासह २ जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा

राज्य मंडळाचे 'कॉपीमुक्त अभियान'; दहावी, बारावी परीक्षांसाठी केली 'ही' तयारी

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीतील सोनपेठ येथील महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केल्याचा प्रकार सोनपेठ पोलिसांनी उघड केला. यानंतर उपकेंद्र संचालकसह ५ शिक्षकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळाच्या व इतर विधिनिष्ठ परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ कलम ५,७,८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समोर आले.

तर दुसरीकडे यवतमाळमधील मुकुटबनमधील शाळेमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला. बारावीचा इंग्रजीचा पेपर सुरु असताना अर्ध्या तासातच इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेची ४ पाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाल्याची घटना समोर आली आणि एकच खळबळ उडाली. यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुकूटबन पोलिसाकडे तक्रार दिली. या तक्रारीवरून केंद्रप्रमुखासह दोघांवर कलम १८८ भारतीय दंडविधान ५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in