Video : घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग BPCLपेट्रोल पंपावर कोसळलं; ४ जणांचा मृत्यू , 50 हून अधिक जखमी

घाटकोपरमध्ये BPCL पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घडली आहे.
 पेट्रोल पंपावर कोसळलं होर्डिग
पेट्रोल पंपावर कोसळलं होर्डिगpriya pandey - X

विशेष प्रतिनिधी, मुंबई:

घाटकोपरमध्ये BPCL पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घडली आहे. घाटकोपर छेडा नगर येथे १२० बाय १२० फुटांचे बेकायदा महाकाय होर्डिंग सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास जवळील पेट्रोल पंपावर कोसळले. या दुर्घटनेत होर्डिंग खाली अडकलेल्या १०० लोकांना रेस्क्यू केले. मात्र दुर्घटनेत ५४ जण जखमी झाले असून जखमींना जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, रेल्वे हद्दीत महाकाय होडिॅग बेकायदा असल्याने जीआरपी व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, ५४ जखमींपैकी ३ जखमींना एचबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वे हद्दीत बेकायदेशीर होर्डिंग-

घाटकोपर छेडानगर येथे कोसळलेले १२० बाय १२० फुटांचे होर्डिंग रेल्वे हद्दीत बेकायदेशीररीत्या उभे होते. या ठिकाणी नियमानुसार ४० बाय ४० फुटांचे होर्डिंग उभारण्याची परवानगी संबंधित कंपनीला पालिकेने दिली होती. मात्र याकडे संबंधित इगो मीडिया कंपनीने दुर्लक्ष करीत २२ एप्रिलपासून होर्डिंगसाठी बेकायदा बांधकाम सुरू केले होते. याबाबत आलेल्या तक्रारींनंतर पालिकेने लोहमार्ग आयुक्तालयाकडे तक्रारही दाखल केली होती. शिवाय संबंधित कंपनीने होर्डिंग दिसण्यासाठी आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग केला होता. याबाबत तक्रारी आल्यानंतर पालिकेने मे महिन्यात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली हाती. या दुर्घटनेमुळे पालिकेने रेल्वेसह संबंधित आस्थापनांना नोटीस बजावली असून एफआयआरही दाखल करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

नियम धाब्यावर बसवून उभारलं महाकाय होर्डिंग-

घाटकोपर येथे पालिकेचे नियम धाब्यावर बसवून रेल्वे वसाहत येथे महाकाय होर्डिंग उभारण्यात आले होते. ७ डिसेंबर २०२१ मध्ये होर्डिंग उभारण्यास रेल्वे लोहमार्ग आयुक्तांनी परवानगी दिली. पालिकेच्या होर्डिंग धोरणामध्ये ४० बाय ४० म्हणजे १ हजार ६०० चौरस फूट पर्यंत होर्डिंग उभारण्यास परवानगी आहे. परंतु इगो मीडिया कंपनीने १२० बाय १२० म्हणजेच १४,४०० चौरस फूट होर्डिंग उभारले. विशेष म्हणजे हे होर्डिंग उभारताना आजूबाजूच्या झाडांवर विष प्रयोग करण्यात आला होता. तर काही झाडे तोडण्यात आली. यावेळी पालिकेने कंपनीला नोटीसही बजावली होती. एवढंच नाही तर धोरणानुसार होडिॅगचे आकारमान मोठे असल्याने नोटीस बजावल्यानंतर हे काम थांबवण्यात आले होते. मात्र तरीही कंपनीने एप्रिल २०२२ पासून होडिॅग उभारण्याचे काम सुरू केले. याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबई महापालिका करणार सखोल चौकशी-

दरम्यान, होर्डिंग कंपनीने पालिकेच्या नोटीसकडे केलेली दुर्लक्ष, लोहमार्ग आयुक्तांनी कोणत्या आधारावर परवानगी दिली. याची मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती ही स्थापन करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान या दुर्घटनेनंतर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीने मुख्यालयातील आपत्कालीन कक्ष जाऊन संपूर्ण दुर्घटनेची माहिती घेत, अग्निशमन दलाला तातडीने मदत कार्य करण्याचा हॉस्पिटलला येणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले.

logo
marathi.freepressjournal.in