मीरा-भाईंंदरमध्ये मालमत्ता करात मोठी वाढ; महासभेत ठराव मंजूर; १ एप्रिल २०२६ पासून अंमलबजावणी

नवीन मालमत्ता कर आकारणी दरांमध्ये सत्ताधारी भाजपने मोठी वाढ केली आहे. त्यामुळे शहरातील निवासी व अनिवासी मालमत्तांच्या करात लक्षणीय वाढ होणार आहे. यापूर्वी निवासी मालमत्तांसाठी २.४० रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना आणि अनिवासी मालमत्तांसाठी ४.५० रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना दर लागू होता.
मीरा-भाईंंदरमध्ये मालमत्ता करात मोठी वाढ; महासभेत ठराव मंजूर; १ एप्रिल २०२६ पासून अंमलबजावणी
Published on

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत १ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन मालमत्ता कर आकारणी दरांमध्ये सत्ताधारी भाजपने मोठी वाढ केली आहे. बुधवारी झालेल्या महासभेत बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे शहरातील निवासी व अनिवासी मालमत्तांच्या करात लक्षणीय वाढ होणार आहे.

यापूर्वी निवासी मालमत्तांसाठी २.४० रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना आणि अनिवासी मालमत्तांसाठी ४.५० रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना दर लागू होता. आता नव्या निर्णयानुसार, निवासी मालमत्ता ४ रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना, अनिवासी मालमत्ता ६ रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना या दराला महापौर डिंपल मेहता यांनी या मंजुरी दिली आहे. नव्याने नोंदणी होणाऱ्या मालमत्तांवर १ एप्रिल २०२६ पासून या दरांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

विरोधकांचा निषेध

या निर्णयास कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या विकास आघाडीने विरोध दर्शविला. तसेच भाजपच्या नगरसेविका निला सोंस यांनीही करवाढीला विरोध केल्याचे समोर आले आहे. विकास आघाडीचे गटनेते जय ठाकूर यांनी आरोप केला की, सत्ताधारी भाजप बहुमताच्या जोरावर नागरिकांवर वारंवार करवाढ लादत आहे. शहरात अनेक नागरी समस्या कायम असताना त्यावर उपाययोजना न करता करवाढ केली जात असल्याची टीका त्यांनी केली. करवाढीतून मिळणाऱ्या निधीच्या वापराबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या निर्णयामुळे नागरिकांवर आर्थिक भार वाढणार असून, शहरात याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in