गणेश दर्शन बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईकरांसह राज्यभरातील भक्त दर्शनासाठी येतात
गणेश दर्शन बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद
Published on

गणेशोत्सवादरम्यान रात्रीच्या वेळेस मुंबईतील विविध भागात असलेल्या सार्वजनिक गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी गणेशभक्तांची मोठी झुंबड उडते. याचा विचार करून यंदा संपूर्ण रात्रभर गणेशभक्तांच्या प्रवासाची सोय बेस्ट उपक्रमांकडून करण्यात आलेली आहे. शनिवारी एका रात्री विविध बस मार्गांवर चार हजारांहून प्रवाशांनी लाभ घेतला असून दुमजली बसने ५०० हून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईकरांसह राज्यभरातील भक्त दर्शनासाठी येतात. भक्तांची प्रवासाची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट उपक्रमाने रात्रीसाठी विशेष गणेश दर्शन बससेवा सुरू केली आहे. विशेष बस सेवेअंतर्गत खुल्या दुमजली बस गाड्या, हो हो बस योजनेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बसगाड्या तसेच संपूर्ण रात्रभर विविध बस मार्गावर चालवण्यात येणाऱ्या विशेष बस गाड्यांचा समावेश आहे. गणेशोत्सवादरम्यान राबविण्यात आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या या विशेष बससेवेला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे आढळून आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in