‘हम दो हमारे दो’; फॅमिली प्लॅनिंगमध्ये महिला नंबर वन

राज्यात फॅमिली प्लॅनिंगमध्ये आघाडी घेतली असून गेल्या साडेचार वर्षांत तब्बल ११ लाख १६ हजार ७८५ महिलांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
‘हम दो हमारे दो’; फॅमिली प्लॅनिंगमध्ये महिला नंबर वन
Published on

गिरीश चित्रे / मुंबई

दिवसेंदिवस वाढती महागाई त्यात लोकसंख्येचा चढा आलेख त्यात कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांचे मुलांच्या देखभालीकडे दुर्लक्ष यामुळे महिलांनी फॅमिली प्लॅनिंगचे नियोजन करत 'हम दो हमारे दो'ला महिलांनी पसंती दिल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. राज्यात फॅमिली प्लॅनिंगमध्ये आघाडी घेतली असून गेल्या साडेचार वर्षांत तब्बल ११ लाख १६ हजार ७८५ महिलांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. दरम्यान, फॅमिली प्लॅनिंगमध्ये पुरुषांची अजूनही उदासीनता दिसून आली असून साडेचार वर्षांत २७ हजार ६३४ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

भारताची लोकसंख्या १०० कोटींच्या घरात पोहोचली आहे. वाढती लोकसंख्या त्यात वाढत्या महागाईचा चढा आलेख यामुळे गृहिणींचे बजट कोलमडले आहे. घरातील जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांनी घरचे बजेट स्थिर व्हावे यासाठी घराबाहेर कामासाठी जाण्यास सुरुवात केली आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना मुलांकडे लक्ष देणे कठिण होत असून वाढती महागाई लक्षात घेता फॅमिली प्लॅनिंगला पसंती दिल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रात लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो. सध्या या कार्यक्रमासाठीचे अनुदान राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरसीएच पीआयपीमधून देण्यात येते. राज्य शासनामार्फत ९ मे २००० च्या शासन निर्णयानुसार लोकसंख्या धोरण स्वीकारले असून छोटया कुटुंबाच्या संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे. छोटे कुटुंब म्हणजे दोन मुल असलेले कुटुंब. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या प्रसूतीपश्चात कुटुंब नियोजन सेवा देण्यावर राज्यात भर देण्यात येत आहे.

यशस्वी नसबंदी शस्त्रक्रिया

- ११ लाख १६ हजार ७८५ महिलांची नसबंदी

- २७ हजार ६३४ पुरुषांची नसबंदी

logo
marathi.freepressjournal.in