मुंबई : प्रत्येक व्यक्तीचे जन्मजात हक्कांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातर्फे रविवार १० डिसेंबर रोजी मुंबईत मानवाधिकार दिन २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष स्वतंत्र कुमार यांच्या उपस्थितीत हा दिन साजरा होणार आहे. “सन्मान, स्वातंत्र्य आणि सर्वांसाठी न्याय” या संकल्पनेवर हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमएसएचआरसीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती के. के. ताटेड, एमएसएचआरसीचे सदस्य ए. ए. सईद, एमएसएचआरसीचे सदस्य संजय कुमार उपस्थितीत राहणार आहेत. मानवी हक्कांच्या मूलभूत तत्त्वांचे समर्थन करण्यासाठी या कार्यक्रमाचे महत्त्व आहे, अशी माहिती आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.