मुंबई, गुजरातच्या समुद्रात शेकडो चिनी बोटी, भारतीय नौदल सतर्क : हेरगिरीसाठी वापर

भारतीय नौदलाच्या वरिष्ठ कमांडर व भारतीय नौदलाच्या संरक्षण सल्लागार गटाने या माहितीला दुजोरा दिला आहे.
मुंबई, गुजरातच्या समुद्रात शेकडो चिनी बोटी,
भारतीय नौदल सतर्क : हेरगिरीसाठी वापर

मुंबई : अरबी समुद्रात मुंबई व गुजरातच्या जवळ शेकडो छोट्या चिनी बोटींचा संशयास्पद वावर दिसल्याने भारतीय नौदल सतर्क झाले आहे. या छोट्या चिनी नौका हेरगिरी करणाऱ्या बोटी असल्याचा इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. या बोटी भारतीय पाणबुड्यांची जागा, बंदराची माहिती गोळा करत असल्याचा कयास आहे.

भारतीय नौदलाच्या वरिष्ठ कमांडर व भारतीय नौदलाच्या संरक्षण सल्लागार गटाने या माहितीला दुजोरा दिला आहे. यातील बहुतांश चिनी बोटी या भारतापासून २०० सागरी मैलावर आहेत. या ठिकाणी भारताची आर्थिक सागरी हद्द संपते.

भारतीय नौदलाचे पश्चिम विभागाकडून या शेकडो बोटींच्या ताफ्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भारताचे वर्चस्व असलेल्या सागरात चिनी जहाजांच्या अचानक येण्याने दक्षिण चीन समुद्रात वापरल्या जाणाऱ्या रणनीतीची मांडणी चीनने केली.

सागरी तज्ज्ञांनी सांगितले की, यातील बहुतांश चिनी बोटी अमेरिकेच्या परदेश मालमत्ता नियंत्रण कार्यालयाच्या निर्बंधांच्या यादीत आहेत. संयुक्त राष्ट्रांकडे अरबी समुद्रातील विशेष आर्थिक विभाग वाढवून देण्याची मागणी भारताने केली आहे. सध्या भारताची विशेष आर्थिक विभागाची हद्द २०० सागरी मैल आहे. ती मुंबई व गुजरातच्या किनारपट्टीपासून ५०० सागरी मैलापर्यंत करावी, अशी मागणी आहे. चीनच्या ग्रे झोन धोरणानुसार, चीनचा भारतीय अर्थव्यवस्थेला व राष्ट्रीय धोरणाला मोठा धोका आहे.

घुसखोरीचा आरोप चीनने फेटाळला

भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात चीनने घुसखोरी केल्याचा आरोप नवी दिल्लीतील चिनी वकिलातीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. चीनची प्रतिमा डागाळण्यासाठी गुप्तचर विभागाचे हे खोटे अहवाल आहेत, असे चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in