विभक्त पत्नीवर पतीकडून तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला

सतत खटके उडत असल्याने विभक्त राहणाऱ्या पहिल्या पत्नीवर तिच्याच पतीने तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला.
विभक्त पत्नीवर पतीकडून तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला

मुंबई : सतत खटके उडत असल्याने विभक्त राहणाऱ्या पहिल्या पत्नीवर तिच्याच पतीने तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मेरी कृष्णा पिल्लई ही महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पांडी शेट्टी या आरोपी पतीविरुद्ध जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या पांडीचा पोलीस शोध घेत आहेत.

ही घटना मंगळवारी रात्री उशिरा एक वाजता विलेपार्ले येथील नेहरूनगर, रोड क्रमांक पाच, हॉटेल साईसनिधीसमोर घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला आणि पांडी हे कौटुंबिक वादानंतर पाच वर्षांपूर्वी विभक्त झाले होते. तरीही त्यांच्यातील खटके सुरू होते. मंगळवारी रात्री उशिरा ती तिच्या दोन्ही मुलांना बहिणीकडे सोडण्यासाठी गेली होती. यावेळी तिच्या मागावर असलेल्या पांडीने आधीच्या भांडणाचा राग काढून तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात मेरी ही गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला स्थानिक रहिवाशांनी तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in