झोपेत असणाऱ्या पत्नीला पतीने धावत्या एक्स्प्रेससमोर ढकलले; आरोपीला अटक

झोपेत असणाऱ्या पत्नीला पतीने धावत्या एक्स्प्रेससमोर ढकलले; आरोपीला अटक

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आरोपी पत्नीला पकडून प्लॅटफॉर्मवर उभा असल्याचे दिसत आहे

उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवास करताना अपघात तसेच इतर घटना प्रतिदिन ऐकिवात येतात; मात्र वसई रेल्वेस्थानकावरील एक धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वसई रेल्वेस्थानकावर सोमवार, २२ ऑगस्ट रोजी एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीला ती झोपेत असतानाच धावत्या एक्स्प्रेस ट्रेन खाली ढकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आल्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आरोपी पत्नीला पकडून प्लॅटफॉर्मवर उभा असल्याचे दिसत आहे. ही महिला झोपेत असल्याचेही व्हिडीओवरून स्पष्ट होत आहे. एक्स्प्रेस ट्रेन येण्याआधी ही व्यक्ती पत्नीला रेल्वे ट्रॅकवर ढकलून देते. या प्रकारानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, पत्नीला धावत्या ट्रेनसमोर ढकलून दिल्यानंतर ही व्यक्ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन पळून जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in