पतीची प्रेयसी नातेवाईक नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

या गुन्ह्याविरोधात पतीच्या प्रेयसीने उच्च न्यायालयात आव्हान देत गुन्हा रद्द करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली.
पतीची प्रेयसी नातेवाईक नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

मुंबई : पतीची प्रेयसी ही कोणत्याही अर्थाने नातेवाईक ठरत नाही, असे स्पष्ट करत मुंबई हायकोर्टाने एका महिलेला मोठा दिलासा देऊन एका प्रकरणात विवाहितेच्या तक्रारीवरून दाखल केलेला क्रूरतेचा गुन्हा रद्द केला.

न्या. अनुजा प्रभुदेसाई आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने पती-पत्नीच्या भांडणात प्रेयसीविरोधात दाखल करण्यात आलेला क्रूरतेचा गुन्हा रद्द रद्द केला. नाशिक जिल्ह्यातील एका विवाहितेने सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याचा आरोप करीत सुरगाणा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी विवाहितेचा पती व त्याच्या कुटुंबीयांसह प्रेयसीविरुद्ध क्रूरतेचा गुन्हा नोंदवला.

या गुन्ह्याविरोधात पतीच्या प्रेयसीने उच्च न्यायालयात आव्हान देत गुन्हा रद्द करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्या. अनुजा प्रभुदेसाई आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने याचिकाकर्त्या महिलेचा दावा मान्य केला.

logo
marathi.freepressjournal.in