ह्युंदेईचा आयपीओ ठरणार देशातील सर्वात मोठा

देशातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी ह्युंदेई मोटर्स इंडिया प्रारंभिक खुली समभाग विक्री (आयपीओ) सुरू करण्याची जय्यत तयारी करीत आहे.
ह्युंदेईचा आयपीओ ठरणार देशातील सर्वात मोठा

मुंबई : देशातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी ह्युंदेई मोटर्स इंडिया प्रारंभिक खुली समभाग विक्री (आयपीओ) सुरू करण्याची जय्यत तयारी करीत आहे. मूळ दक्षिण कोरियन कंपनीची ही भारतीय शाखा आहे. उपलब्ध माहितीनुसार हवालात असे म्हटले आहे की ह्युंदेई मोटर्स इंडियाचा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असू शकतो. सध्या, विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ आहे. या आयपीओच्या माध्यमातून एलआयसीने तब्बल २१ हजार कोटी रुपये भांडवल उभे केले होते.

कंपनीच्या भारतीय युनिटने आयपीओ लाँच करण्याची तयारी करत आहे. दिवाळीच्या आसपास भारतीय बाजारपेठेत आयपीओ सुरू केला जाईल. सध्या देशातील सर्वात मोठा आयपीओ विमा क्षेत्रातील एलआयसी या सरकारी कंपनीचा होता, ज्याची किंमत २१ हजार कोटी रुपये होती. असा दावा केला जात आहे की ह्युंदेई आणखी मोठा आयपीओ सुरू करण्याच्या तयारीत आहे.

ह्युंदेईने आयपीओसाठी बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टॅनले, गोल्डमन सॅक्स आणि जेपी मॉर्गन या जगातील ४ प्रमुख बँकिंग सल्लागारांची मदत घेतली आहे. बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टॅनले, गोल्डमन सॅक्स आणि जेपी मॉर्गन यांच्यासह अनेक गुंतवणूक सल्लागारांनी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना आयपीओ बाबतचा मसुदा आणि प्रस्ताव दाखवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in