शरद पवारांसाठी जीवाचे रान करू

आर. आर. पाटील पुत्राने दिला विश्वास
शरद पवारांसाठी जीवाचे रान करू

मुंबई : सामान्य माणूस ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष करू. येणाऱ्या काळात साहेबांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त जागा निवडून येतील, यासाठी जीवाचे रान करू, असा विश्वास आर. आर. पाटील यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी व्यक्त केला. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मेळाव्यात रोहित पाटील बोलत होते.
रोहित पाटील म्हणाले, ‘‘सध्या बाका प्रसंग निर्माण झाला आहे. आपण सर्वांना मिळून एकत्र भूमिका घ्यावी लागेल. ज्याप्रमाणे मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वाटेल ते करण्याची भूमिका घेतली, तीच भूमिका पवार साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. साहेबांच्या विचारांची खूणगाठ बांधूया आणि राज्यात पुन्हा आपली सत्ता आणूया, अशी शपथ घेऊयात,’’ असेही रोहित पाटील म्हणाले

logo
marathi.freepressjournal.in