आइस्क्रीम पार्लर, ज्यूस बारची झाडाझडती; अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी होणार

उन्हाळ्यात अनेक ठिकाणी अन्नाची तपासणी करणे गरजेचे आहे. आम्ही अन्न, बर्फ व पाण्याचे नमूने गोळा करणार आहोत. उन्हाळ्याच्या काळात आजारांचे प्रमाण वाढते, असे राज्याचे एफडीए आयुक्त (अन्न) शैलेश आढाव म्हणाले
आइस्क्रीम पार्लर, ज्यूस बारची झाडाझडती; अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी होणार

स्वप्नील मिश्रा/मुंबई : कडक उन्हाळा सुरू झाले. या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी नागरिक थंडगार ज्यूस, शीतपेय, आइस्क्रीमचा आधार घेतात. हे सर्व पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील आइस्क्रीम पार्लर, ज्यूस बारची झाडाझडती घेण्याचे ठरवले आहे. ग्राहकांना भेसळयुक्त थंड पदार्थ मिळू नयेत यासाठी ही काळजी घेतली जाणार आहे.

अनेक विक्रेते अस्वच्छ पदार्थ पुरवून ग्राहकांची फसवणूक करतात. कारण पदार्थांची तपासणी होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात बर्फ व त्याच्याशी संबंधित पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता असते.

राज्याचे एफडीए आयुक्त (अन्न) शैलेश आढाव म्हणाले की, उन्हाळ्यात अनेक ठिकाणी अन्नाची तपासणी करणे गरजेचे आहे. आम्ही अन्न, बर्फ व पाण्याचे नमूने गोळा करणार आहोत. उन्हाळ्याच्या काळात आजारांचे प्रमाण वाढते.

कारण दूषित पाणी व अन्न हे त्याचे मूळ कारण आहे. हे अन्नपदार्थ खाऊन नागरिक आजारी पडू शकतात. दर्जेदार नसलेले उत्पादन आढळल्यास आम्ही त्याची तपासणी करणार आहोत. तसेच त्यातील अन्नपदार्थ कोणते वापरले आहेत याची चाचणी करू, असे ते म्हणाले.

सध्या शहरातील तापमान वाढू लागले आहे. त्यामुळे शीतपेय व आइस्क्रीमची मागणी वाढली आहे. या थंड पदार्थांमुळे उन्हाळ्यात दिलासा मिळतो. त्यामुळे रस्त्यावरील स्टॉल, ज्यूस सेंटर व आइस्क्रीम पार्लरची तपासणी सुरू केली जाणार आहे. आम्ही आमच्या अन्न निरीक्षकांना स्टॉलची तपासणी करायला सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in