हेल्मेटचा पट्टा लावला नसेल तर दोन हजार रुपयांचे चलान कापले जाणार

 हेल्मेटचा पट्टा लावला नसेल तर दोन हजार रुपयांचे चलान कापले जाणार

रस्त्यावर वाहतूक करताना प्रशासनाने काही नियम आखून दिले आहेत. स्वतःसोबत इतरांच्या सुरक्षेसाठी त्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असताना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. यामध्ये दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेटचा वापर टाळणे, अथवा नियमबाह्य फॅशनेबल हेल्मेट दुचाकीस्वारांकडून वापरण्यात येते.

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक असते; मात्र काही प्रवासी वाहतूक पोलीस दिसल्यावर घाईत हेल्मेट घालण्याचा प्रयत्न करतात. याबाबत वारंवार सूचनाही वाहतूक पोलिसांकडून दिल्या जातात. तरीही बहुतांशी दुचाकीस्वार या नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. परिणामी, हेल्मेट घातले असेल मात्र हेल्मेटचा पट्टा लावला नसेल, तर दुचाकीस्वाराला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी शासनाकडून तब्ब्ल दोन हजार रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याने नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, देशात दुचाकींसाठी केवळ बीआयएस मान्यताप्राप्त हेल्मेटच्या निर्मिती आणि विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी चालवताना हेल्मेट घातले आहे; पण हेल्मेटचा पट्टा लावला नसेल तर दोन हजार रुपयांचे चलान कापले जाणार आहे. यासोबत सदोष हेल्मेट म्हणजेच नवीन नियमानुसार बीआयएस नसलेले हेल्मेट घातले तर एक हजार रुपयांचे चलान कापले जाणार आहे. नियम १९४ डी एमव्हीएनुसार ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in