असेच चालले तर मुदतीत सुनावणी पूर्ण करणे अवघड! विधानसभाध्यक्षांनी व्यक्‍त केली नाराजी

२१ जून २०२१ रोजी बजावण्यात आलेल्या व्हीपवरूनच सुनिल प्रभू यांना उलटसुलट प्रश्न विचारण्यात आले.
असेच चालले तर मुदतीत सुनावणी पूर्ण करणे अवघड! विधानसभाध्यक्षांनी व्यक्‍त केली नाराजी

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर बुधवारी पार पडली. शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष यावेळी नोंदविण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वकिल महेश जेठमलानी यांनी यावेळी सुनील प्रभू यांना व्हीपसंदर्भात अतिशय महत्वाचे प्रश्न विचारले.

सुनील प्रभू यांना व्हीपशी संबंधित अगदी खोलात जाऊन प्रश्न विचारण्यात आले. प्रभूंच्या काही उत्तरांवर जेठमलानी यांनी आक्षेपही घेतला. त्यावेळी ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत आणि जेठमलानी यांच्यात खडाजंगीही झाली. सुनील प्रभू यांनी जेठमलानी यांच्या प्रश्नांपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी अध्यक्षांकडे केली. जोरदार वादविवादांवर नाराज होत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मला ३१ डिसेंबरपर्यंत या प्रकरणांची सुनावणी संपवायची आहे. सार्वजनिक सुट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याकरिता फक्त १६ दिवसाचा कालावधी आहे. सुनावणी या गतीने सुरू राहिली तर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करणे अवघड होईल, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. शिंदे गटाच्या वतीने बजावण्यात आलेला व्हीपच बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे.

राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष सध्या सुरू आहे. शिंदे गटाने बजावण्यात आलेल्या व्हीप म्हणजे पक्षादेशावरच आक्षेप घेतला आहे. कारण पक्षादेश हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे.

कथितरित्या जारी करण्यात आलेला २० जूनचा मूळ व्हीप हा आपल्याकडून तयार करण्यात आला नव्हता. यावर आपलं काय म्हणणं आहे, असा प्रश्न जेठमलानी यांनी प्रभूंना केला. त्यावर हे पूर्णपणे चुकीचं असल्याचे प्रभू म्हणाले. या व्हीपची मूळ कॉपी पाहिली तर त्यात वर पक्षादेश २/२२ याचा अर्थ असा आहे का, की हा दुसरा व्हीप आहे २०२२ वर्षातील जो शिवसेना विधिमंडळ पक्षाकडून पाठवण्यात आला आहे, असे जेठमलानी म्हणाले. त्यावर मी याबाबत आता सांगू शकत नसल्याचे प्रभूंनी स्पष्ट केले. व्हीपवरचा नंबर मी वाचल्याचे आठवत नाही. पण, त्यावरील ओळन‌् ओळ मी वाचली आणि सही केल्याचे प्रभू म्हणाले. त्यावर जेठमलानी यांनी आपण दोन व्हिप जारी केले होते. २१ जून २०२२ रोजीच्या व्हिपवरील नंबर बनावटी असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला.

यावेळी झालेल्या खडाजंगीनंतर ज्या गतीने सुनावणी सुरू आहे त्यावर विधानसभा अध्यक्षांची नाराजी व्यक्त केली. सुनावणीसाठी फक्त १६ दिवस माझ्याकडे आहेत. त्यात हे प्रकरणाची सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे. मला ३१ डिसेंबर पर्यत हे प्रकरणांची सुनावणी संपवायची आहे. सार्वजनिक सुट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याकरिता फक्त १६ दिवसाचा कालावधी आहे. याच गतीने जर सुनावणी सुरू राहिली तर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करणे अवघड होईल अशा शब्दांत राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली.

व्हीपवरून प्रभूंना घेरले

२१ जून २०२१ रोजी बजावण्यात आलेल्या व्हीपवरूनच सुनिल प्रभू यांना उलटसुलट प्रश्न विचारण्यात आले. ‘हा व्हीप आपणच बजावला का. त्यावर केलेली स्वाक्षरी आपलीच आहे का, कारण व्हीपवरची सही आणि प्रतिज्ञापत्रावरची आपली सही यात फरक आहे असा प्रश्न प्रभूंना विचारण्यात आला. त्यावर सहया आपल्याच आहेत. मी दोन प्रकारच्या सहया करतो. पूर्ण सही करताना एस डब्ल्यू प्रभू आणि छोटी सही करताना फक्त एसपी अशी सही करतो असे प्रभू म्हणाले. पक्षादेश बजावण्यास कोणी सांगितले. पक्षाध्यक्षांनी सांगितले का, ते आदेश कशा प्रकारे आले असे प्रश्न प्रभूंना करण्यात आले. त्यावर टेलिफोनिक संभाषणाद्वारे आपल्याला सांगण्यात आल्याचे प्रभू म्हणाले. विधानपरिषद निवडणुकांच्या निकालांनंतर शिवसेनेचे आमदार मिसिंग असल्याचे कळताच उदधव ठाकरेंनी आपल्याला ही बैठक आयोजित करण्यास सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in