हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनात झाली.
हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरु नका. हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा,” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर शनिवारी हल्लाबोल केला.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनात झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, मंत्री अनिल परब, शिवेसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना खुले आव्हान दिले. ‘बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या बापाचे नाव वापरुन मते मागा. आधी दास होता, आता नाथ झाला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. बंडखोरांना काय तो निर्णय घेऊ द्या, मग आपण आपली रणनीती ठरवूया. शिवसैनिकांनी अशीच एकजूट दाखवावी. आपण त्यांना धडा शिकवू. शिवसेना निखारा आहे, बंडखोरांनी पाय ठेवला तर जळून जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in