वेळेपूर्वी कार्यालय सोडले तर…; BMC प्रशासनाचा इशारा

फेशियल बायोमेट्रिक हजेरी लावण्यासाठी अधिकारी व कर्मचारी वेळेआधीच रांगेत उभे असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
वेळेपूर्वी कार्यालय सोडले तर…; BMC प्रशासनाचा इशारा
Published on

मुंबई : फेशियल बायोमेट्रिक हजेरी लावण्यासाठी अधिकारी व कर्मचारी वेळेआधीच रांगेत उभे असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयासह २५ वॉर्डात एक लाखाहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी फेशियल बायोमेट्रिक हजेरी पद्धत अंमलात आणली आहे. मात्र अनेक अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयीन वेळेपूर्वी कार्यालयातून निघून फेशियल बायोमेट्रिक हजेरी मशीनसमोर रांग लावून उभे असतात. अधिकारी व कर्मचारी यांचे हे वर्तन कार्यालयीन शिस्तीविरूध्द आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख यांना सूचित करण्यात आले आहे की, याबाबत जातीने लक्ष देऊन त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेपूर्वी कार्यासन सोडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अन्यथा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी समज त्यांना द्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in