नाल्यात गाळ दिसल्यास आजपासून तक्रार करा!

१ जूनपासून पर्जन्य जलवाहिन्या विभागाची व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांक मुंबईकरांच्या सेवेत असेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले
नाल्यात गाळ दिसल्यास आजपासून तक्रार करा!
Published on

आपल्या प्रभागातील नाल्यातील गाळ काढण्यात आला आहे की नाही, नालेसफाई झाली की नाही याची तक्रार आता घरबसल्या करता येणार आहे. नाल्यातून गाळ काढण्याची तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्सअप चॅटबॉट प्रणालीच्या ९३२४५००६०० या क्रमांकावर नोंदवता येणार आहे. गुरुवार, १ जूनपासून पर्जन्य जलवाहिन्या विभागाची व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांक मुंबईकरांच्या सेवेत असेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईचे १०० टक्के टार्गेट पूर्ण झाले आहे. तरीही आपल्या प्रभागातील नालेसफाईचे काम पूर्ण झाले नसेल तर मुंबईकरांना तक्रार करण्यासाठी व्हाट अँप नंबर उपलब्ध करुन द्या, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला नालेसफाईच्या कामाची पहाणी केल्यानंतर दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईकरांना तक्रार करण्यासाठी नंबर जाहीर केला आहे.

२४ विभाग कार्यरत

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांतील पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या सहायक अभियंता आणि २४ विभाग कार्यालयात तक्रारी पाहण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in