भाजपमध्ये यायचे असेल तर या मात्र सरकारमध्ये खोडा घालू नका,रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुद्द्यावर रावसाहेब दानवे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना मागील घटनांबद्दल पश्चाताप झाला असेल तर आम्ही त्यांना घ्यायला तयार आहोत
 भाजपमध्ये यायचे असेल तर या मात्र सरकारमध्ये  खोडा घालू नका,रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Published on

“उद्धव ठाकरेंनी भाजपमध्ये यावे की नाही, हे म्हणण्यासाठी आम्ही आता त्यांच्या दारात जाणार नाही. त्यांना भाजपमध्ये यायचे असेल तर यावे; मात्र आताच्या सरकारमध्ये त्यांनी खोडा घालू नये,” असा टोला भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर भाजप-शिंदे गट यांचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानंतर शिंदे गटातील काही आमदार शिवसेनेला सोबत येण्यासाठी हाक देत आहेत. याच मुद्द्यावर रावसाहेब दानवे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना मागील घटनांबद्दल पश्चाताप झाला असेल तर आम्ही त्यांना घ्यायला तयार आहोत; पण आमच्यासोबत आल्यानंतर आताच्या सरकारमध्ये डिस्टर्ब करू नये. राजकारणामध्ये कुणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. उद्धव ठाकरे २५ वर्षे आमच्यासोबत होते. आता ते काही दिवस काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहेत; मात्र एकनाथ शिंदे हे आमचे नवे मित्र झाले आहेत. मैत्री दिनाच्या दिवशी शिंदे गटातून कुणी शुभेच्छा दिल्या असतील तर वेगळा अर्थ काढू नका.

केंद्रात २०१४पेक्षा जास्त मतांनी सध्याचे सरकार सत्तेवर आहे. ज्या दिवशी आम्ही निवडणूक जिंकतो, त्याच्या पुढच्याच दिवसापासून पुढील निवडणुकीची तयारी करत असतो. आता महाराष्ट्रात मिशन ४८ आम्ही हाती घेतले आहे. संपूर्ण ४८ जागा आम्ही जिंकणार आहोत,” असा दावाही दानवे यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in