प्लास्टिकविरोधी कारवाईकडे दुर्लक्ष अधिकाऱ्यांना भोवणार

प्लास्टिक पिशव्या विक्री व उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
प्लास्टिकविरोधी कारवाईकडे दुर्लक्ष अधिकाऱ्यांना भोवणार

प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात कारवाई जोमात सुरु असताना पालिकेच्या पाच ते सहा विभाग कार्यालयाकडून कारवाई कडे दुर्लक्ष केले जात आहे. पाच ते सहा विभाग कार्यालयाच्या दुकान व अस्थापने विभागातील अधिकारी प्रशासनाच्या रडारवर आले असून हलगर्जीपणा आढळल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिल्याचे पालिकेचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले.

२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास प्लास्टिक पिशव्या कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत प्लास्टिक पिशव्या विक्री व उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मात्र मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी कोरोना विरोधात लढ्यात उतरला. त्यामुळे प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाई थंडबस्त्यात गेली होती; मात्र कोरोनाची चौथी लाट रोखण्यात यश आल्यानंतर पुन्हा एकदा प्लास्टिक विरोधात कारवाईला वेग दिला जात आहे.

जुलै ते आतापर्यंत ३८३ प्रकरणात २,११५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून १९ लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर ८ जणांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

प्लास्टिक विरोधी कारवाई होत असताना पालिकेच्या काही विभाग कार्यालयातील दुकान व अस्थापने विभागातील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. प्लास्टिक विरोधी कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करत प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे ही ते म्हणाले

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in