IIT Bombay मध्ये छतावरील पंख्यांऐवजी भिंतीवरचे पंखे

वसतिगृहांच्या नूतनीकरण प्रक्रियेचा भाग म्हणून काही खोल्यांमधील छतावरील पंखे काढून त्याऐवजी भिंतीवरचे पंखे लावण्यास सुरुवात, उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय चर्चेत...
IIT Bombay मध्ये छतावरील पंख्यांऐवजी भिंतीवरचे पंखे
IIT Bombay मध्ये छतावरील पंख्यांऐवजी भिंतीवरचे पंखे
Published on

श्रेया जाचक/मुंबई

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने (आयआयटी मुंबई) कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या वसतिगृहांच्या नूतनीकरण प्रक्रियेचा भाग म्हणून काही खोल्यांमधील छतावरील पंखे काढून त्याऐवजी भिंतीवर बसवले जाणारे पंखे लावण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय चर्चेत आला आहे. या आधी इतर काही शैक्षणिक संस्थांनी आत्महत्येचे मार्ग रोखण्यासाठी अशा प्रकारचे बदल केले होते.

नूतनीकरण नियोजित

आयआयटी मुंबई प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, वसतिगृहांच्या नूतनाची अनेक कामे आधीपासूनच प्रस्तावित होती आणि पंखे बदलणे हा त्याच व्यापक प्रक्रियेचा एक भाग आहे. वसतिगृहांच्या नूतनाची अनेक कामे नियोजित होती आणि हे काम त्याचाच एक भाग आहे. नुकत्याच घडलेल्या आत्महत्येच्या घटनेशी याचा थेट संबंध जोडता येणार नाही, असे आयआयटी मुंबईच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, किती वसतिगृहांच्या खोल्यांमधील छतावरील पंखे बदलले जाणार आहेत आणि त्यासाठी काय मुदत असेल, याबाबतची माहिती संस्थेने अद्याप प्रसिद्ध केलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in