

अमित श्रीवास्तव/मुंबई
मेंदूच्या कर्करोगापैकी अत्यंत प्राणघातक प्रकारांपैकी एक असलेला आजार उपचारानंतरही नेहमीच पुन्हा का उद्भवतो, यामागील एक मुख्य कारण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. अभ्यासात दिसून आले की, केवळ अनुवांशिक बदलच नाही, तर मेंदूच्या ऊतींचा मऊपणामुळे पुन्हा उद्भवणाऱ्या ट्यूमरला अधिक आक्रमक बनवू शकतो. तसेच यामुळे औषधांची अशी लक्ष्ये समोर येऊ शकतात जी पारंपारिक प्रयोगशाळा पद्धतींद्वारे शोधण्यात अपयश येते.
टाटा मेमोरियल सेंटरच्या ‘ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर’मधील संशोधकांच्या सहकार्याने आयआयटी बॉम्बेचे प्रा. अभिजीत मजुमदार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संशोधनाने, प्लास्टिकच्या प्रयोगशाळेत कॅन्सरच्या पेशींचा अभ्यास करण्याच्या दीर्घकाळापासून चालत आलेल्या पद्धतीला आव्हान दिले आहे.
‘ग्लिओब्लास्टोमा’ हा वेगाने वाढणारा मेंदूचा कर्करोग आहे. ज्याच्यावर उपचार करणे कठीण असते आणि शस्त्रक्रिया, रेडिएशन व केमोथेरपीनंतरही तो अनेकदा पुन्हा उद्भवतो. निदानानंतर रुग्ण साधारणपणे सहा महिने ते एका वर्षापर्यंतच जगू शकतात, तर पुन्हा उद्भवणारे ट्यूमर सहसा अधिक आक्रमक आणि उपचारांना प्रतिकार करणारे असतात.
‘मॅट्रिक्स बायोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, संशोधकांनी ग्लिओब्लास्टोमा पेशींवर रेडिएशनचा प्रयोग करून ट्यूमरच्या पुनरावृत्तीची परिस्थिती निर्माण केली, ज्यामुळे केवळ उपचारांना प्रतिकार करणाऱ्या पेशीच जिवंत राहिल्या. या जिवंत राहिलेल्या पेशी जेव्हा उंदरांच्या मेंदूत रोपित करण्यात आल्या, तेव्हा त्यांनी मूळ कॅन्सरच्या पेशींपेक्षा अधिक आक्रमक ट्यूमर तयार केले, जे डॉक्टरांना रुग्णांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांशी तंतोतंत जुळणारे होते. तथापि, जेव्हा या पेशी नेहमीच्या प्लास्टिकच्या प्रयोगशाळा डिशवर वाढवल्या गेल्या, तेव्हा त्या मूळ ट्यूमर पेशींपेक्षा वेगळ्या दिसल्या नाहीत, ज्यामुळे त्यांचे जैविक फरक लपून राहिले.
मेंदूच्या वास्तविक वातावरणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी, टीमने विशेष रीतीने तयार केलेल्या मऊ हायड्रोजेलवर- मेंदूच्या ऊतींच्या मऊपणाशी जुळणाऱ्या जेलसारख्या पदार्थांवर - पेशी वाढवल्या.
वास्तववादी प्रयोगशाळा मॉडेल्सची गरज
ते पुढे म्हणाले की, अधिक वास्तववादी प्रयोगशाळा मॉडेल्समुळे कॅन्सरवरील औषधांचा शोध सुधारेल आणि प्रयोगशाळा अभ्यासात आशादायक दिसणाऱ्या परंतु मानवी क्लिनिकल चाचण्यांमध्ये अपयशी ठरणाऱ्या कॅन्सर औषधांच्या जवळपास ९०% अपयश दरावर मात करण्यास मदत होईल.