हॉस्टेलमध्ये मुलींना डोकावून पाहणाऱ्या आरोपीस अटक ; आरोपी पवई आयआयटीच्या कॅण्टीनचा कर्मचारी

रविवारी सायंकाळी काही मुली हॉस्टेलमध्ये बसल्या होत्या. यावेळी तिथे कोणीतरी त्यांना डोकावून पाहत असल्याचे काही मुलीच्या लक्षात आले
हॉस्टेलमध्ये मुलींना डोकावून पाहणाऱ्या आरोपीस अटक ; आरोपी पवई आयआयटीच्या कॅण्टीनचा कर्मचारी

हॉस्टेलमध्ये मुलींना डोकावून पाहणाऱ्या एका आरोपीस पवई पोलिसांनी अटक केली. पिंटू गारिया असे या आरोपीचे नाव असून तो आयआयटीच्या कॅण्टीनचा कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

पवईतील आयआयटीमध्ये देशभरातून शिक्षणासाठी विद्यार्थी येत असून या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था तेथीलच वसतीगृहात केली जाते. रविवारी सायंकाळी काही मुली हॉस्टेलमध्ये बसल्या होत्या. यावेळी तिथे कोणीतरी त्यांना डोकावून पाहत असल्याचे काही मुलीच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सुरक्षारक्षकांना ही माहिती सांगितली. या माहितीनंतर सुरक्षाक्षकाने पवई पोलिसांना ही माहिती दिली. घटनास्थळाचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यांनतर तिथे पिंटू हा मुलीना डोकावून पाहत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. पिंटू हा आयआयटी कॅण्टीनमध्ये काम करीत होता. काही महिन्यांपूर्वीच तो तिथे कामावर लागला होता. त्याने यापूर्वीही अशा प्रकारचे कृत्य केले आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in