पाच दिवसांचा आठवडा लागू करा ; पालिका परिचारिकांचे १५ मेला सामुदायिक रजा आंदोलन

पालिका रुग्णालयातील परिचारिकांचा पाच दिवसांचा आठवडा व्हावा यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने सातत्याने प्रशासनाकडे मागणी
पाच दिवसांचा आठवडा लागू करा ; पालिका परिचारिकांचे १५ मेला सामुदायिक रजा आंदोलन

मुंबई महानगरपालिकेतील परिचारिका सवंर्गास ५ दिवसाचा आठवडा लागू करण्यात यावा या मागणीसाठी येत्या सोमवारी, १५ मे रोजी सर्व रुग्णालयातील परिचारिकांनी सामुदायिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. परळ येथील विभाग कार्यालयात सकाळी १० वाजता मोठ्या संख्येने परिचारिका एकत्र येणार असल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून सांगण्यात आले.

पालिका रुग्णालयातील परिचारिकांचा पाच दिवसांचा आठवडा व्हावा यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने सातत्याने प्रशासनाकडे मागणी केली आहे. अनेकवेळा संबंधित अधिका-यांची भेट घेऊन चर्चाही करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने याबाबत कायम नकारात्मक भूमिका घेवून विलंब केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिचारिका संवर्गात मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिचारिकांनी आता आंदोलनाचा भूमिका घेतली आहे. येत्या १५ मे रोजी परिचारिका मोठ्या संख्येने म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सरचिटणीस सत्यवान जावकर यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक रजा आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही कामगार सेनेचे बाबा कदम यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in