अल्पवयीन मुलीला शिक्षेसाठी चुकीचा स्पर्श करणे अयोग्य; बॅटमिंटन प्रशिक्षकाला ५ वर्षांची शिक्षा

मुलुंडच्या एका क्लबमध्ये ही अल्पवयीन मुलगी बॅटमिंटन शिकायला जात होती. तिच्यासोबत कायम एक घरातील मदतनीस महिला असायची
अल्पवयीन मुलीला शिक्षेसाठी चुकीचा स्पर्श करणे अयोग्य; बॅटमिंटन प्रशिक्षकाला ५ वर्षांची शिक्षा

चारुल शहा-जोशी/मुंबई : अल्पवयीन मुलीला चुकीची शिक्षा म्हणून तिच्या छातीला आणि तिच्या पार्श्वभागावर मारणे चुकीचे आहे, असे मत व्यक्त करून विशेष पोस्को न्यायालयाने बॅटमिंटन प्रशिक्षकाला दोषी ठरवले. त्याला ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

मुलीच्या छातीला हात लावणे किंवा तिच्या पार्श्वभागावर मारणे हे १० वर्षांच्या मुलीची शिक्षा होऊ शकत नाही. शिकवत असताना अनावधनाने तिला हात लागू शकतो, मात्र तिची छाती दाबणे हे अयोग्य आहे, असे मत विशेष न्यायाधीश कल्पना पाटील यांनी व्यक्त केले.

मुलुंडच्या एका क्लबमध्ये ही अल्पवयीन मुलगी बॅटमिंटन शिकायला जात होती. तिच्यासोबत कायम एक घरातील मदतनीस महिला असायची. १० जुलै २०१९ मध्ये ती ४.३० वाजता बॅटमिंटन क्लासला गेली. त्यानंतर ७ वाजता ती नृत्याच्या क्लासला गेली. घरी परतल्यावर तिने आपल्या आईला बॅटमिंटन प्रशिक्षकाने केलेल्या कृत्याची माहिती दिली. तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ क्लबमध्ये धाव घेतली. तेथील मुख्य प्रशिक्षकाने सर्व आरोप फेटाळले. त्यानंतर ११ जुलै २०१९ मध्ये मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. प्रशिक्षकाने बचावात सांगितले की, कोणत्याही विद्यार्थ्याने चूक केली तर शिक्षक जवळ येऊन त्याची कृती योग्य करतो. त्यावेळी प्रशिक्षकाचा विद्यार्थ्याला स्पर्श होतो. त्या मुलीला झालेला स्पर्श हा प्रशिक्षण व शिक्षेचा भाग होता.

तेव्हा कोर्टाने प्रशिक्षकाचा युक्तिवाद फेटाळून लावला. कोर्टाने सांगितले की, प्रशिक्षणाच्या प्रक्रियेत बंद पडणे आणि अपघाताने झालेला स्पर्श, चुकीची शिक्षा यामुळे तिला जर अस्वस्थ वाटत असेल तर प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या काही दिवसांत तिने तक्रार केली असती. प्रशिक्षण प्रक्रियेदरम्यान घटनेच्या दिवशी तिला आरोपीचा स्पर्श जाणूनबुजून जाणवला, म्हणून तिने त्याविरुद्ध तक्रार केली आहे. १० वर्षांच्या मुलीच्या नितंबावर चिमटे काढणे आणि चापट मारणे ही शिक्षेची पद्धत नक्कीच नाही, असे न्यायालयाने सांगितले. सर्व्हिस शिकवताना प्रशिक्षणार्थीला अपघाताने हात लागणे समजू शकतो. मात्र तिची छाती दाबणे अयोग्य आहे, असे न्यायालयाने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in