चैत्यभूमीवर अस्वच्छता; अजित पवारांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडनी

आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दादर येथील चैत्याभूमीवर जाऊन पाहणी केली
चैत्यभूमीवर अस्वच्छता; अजित पवारांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडनी

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच चैत्यभूमीवर हजेरी लावली होती. यावेळी चैत्यभूमीवरील अस्वच्छता दिसली आणि ती पाहून उपमुख्यमंत्री संतापल्याचं पाहायला मिळालं. यासंबंधी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत.

अजित पवार यांना व्हुईग गॅलरीमध्ये अस्वच्छता निदर्शनास आली आहे. यावरुन ते तिथे काहीसे संतापले होते. सकाळी लवकर कार्यक्रमस्थळी येऊन अजित पवार यांनी पाहणी केली होती. यावेळी त्यांना प्रेक्षक गॅलरीत अस्वच्छता दिसली. यासंबंधी त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक दादर येथे येऊ लागले आहेत. चैत्यभूमीला लोकांनी दोन ते तीन दिवसांआधीच हजेरी लावली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील चैत्यभूमीवर आज येणार आहेत. तसंच राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येणार आहेत. शिक्षण मंत्री दिपक केसरकर चैत्यभूमीवर आले आहेत. याशिवाय मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांचे इतर अधिकारी देखील चैत्यूभमीवर हजर राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in