१७ दिवसांत ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत ४७ जणांना अटक

या आरोपींकडून आतापर्यंत ३ कोटी ८६ लाख ५९ हजार ४१० रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.
१७ दिवसांत ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत ४७ जणांना अटक

मुंबई : गेल्या सतरा दिवसांत मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विविध युनिटने मुंबईने शहरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या ४७ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून आतापर्यंत ३ कोटी ८६ लाख ५९ हजार ४१० रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. ड्रग्ज तस्कराविरोधातील ही कारवाई आगामी काळात अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. २६ एप्रिलपासून मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज खरेदी विक्रीसह ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतले होते. ही कारवाई सुरू असताना पोलिसांनी सोळा गुन्ह्यांची नोंद केली होती. त्यातील चार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या सोळा गुन्ह्यांत पोलिसांनी २३ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ९.३ ग्रॅम कोकेन, १०८.१५ ग्रॅम चरस, ७८७.६१ ग्रॅम एमडी, २ किलो ४६२ गांजा असे विविध ड्रग्जचा साठा जप्त केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in