भांडुप पश्चिम भागात वर्षभरात पाच वेळा जलवाहिनी फुटली

जलवाहिनी फुटल्याने घाटकोपर ते भांडुप परिसरात राहणाऱ्या रहिवाशांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होत आहे
 भांडुप पश्चिम भागात वर्षभरात पाच वेळा जलवाहिनी फुटली

भांडुप पश्चिम भागात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेल्या वर्षभरात पाच वेळा फुटली; मात्र पालिकेच्या जलविभागाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढला नसून १० दिवसांपूर्वी पुन्हा एकदा जलवाहिनी फुटल्याने घाटकोपर ते भांडुप परिसरात राहणाऱ्या रहिवाशांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होत आहे.

घाटकोपर ते भांडुप पश्चिम परिसराला पाणीपुरवठा करणारी ९०० मिमी व्यासाची जीआरपी जलवाहिनी १० सप्टेंबर रोजी फुटली होती. दुरुस्ती काम पूर्ण होईपर्यंत तब्बल तीन दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. नऊ दिवसांनंतर १९ सप्टेंबरला पुन्हा जलवाहिनी फुटली. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून लालबहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी पश्चिम, विक्रोळी पार्क साईट, लोअर डेपो पाडा, पंपिंग स्टेशनवरून पाणीपुरवठा होणारे इतर विभाग, वीर सावरकर मार्ग, विक्रोळी स्टेशन रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर पश्चिम, वाधवा, कल्पतरू, दामोदर पार्क, साईनाथ नगर रोड, गार्डन लेन, संघांनी इस्टेट यासह परिसरातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in