एमईओ क्लास वन परीक्षा कॉपीप्रकरणी ;विद्यार्थ्यांसह २७ जणांवर गुन्हा दाखल समुद्र वाणिज्य विभागाची तक्रार

समुद्र वाणिज्य विभागाकडून शहानिशा करण्यात आली
एमईओ क्लास वन परीक्षा कॉपीप्रकरणी ;विद्यार्थ्यांसह २७ जणांवर गुन्हा दाखल समुद्र वाणिज्य विभागाची तक्रार

मुंबई : एमईओ क्लास वन परिक्षेत कॉपी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता संबंधित २२ विद्यार्थ्यांसह इतर पाच अशा २७ जणांविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. समुद्र वाणिज्य विभागाकडून आलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदविण्यात आला असून लवकरच या सर्व विद्यार्थ्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

सौरभ अग्रवाल, चंदन सिंग, सर्व्हेश गडदे, सुरेश वाघेला, गौरव संजीव नायक, मोबीन पॉल चेरीयन, किरण मारियथ मुरलीधरन, निरज भरत बंब, सुयोग प्रविण भालेराव, नितीन सुरेश जोधवानी, पवनदिप सिंग, अरुल कृष्णन, सौरभ दास, नितीन यादव जाधव, अंकुश जौहरी, सुधीरकुमार बुद्धीनेनी, तुकामन सिंग, सागर गोयल, उदीत सारस्वत, सचिन कुमार, राजस सुनिल पंडीत, भुपेश यादव, हरिश हौसदुर्ग, विमन बिस्त, ऋषी जैन आणि विपीन पाटील अशी या २७ जणांची नावे आहेत.

१ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत फोर्टच्या बलार्ड पिअर येथील कार्यालयात एमईओ क्लास वन या पदासाठी लागणारे सक्षमता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा चालू असताना सुनील तन्वर, सौरभ अग्रवाल, चंदन सिंग, सर्व्हेश गडदे, सुरेश वाघेला यांनी कट रचून परीक्षा देणाऱ्या २२ विद्यार्थ्यांना पास करण्याचे आमीष दाखवत त्यांच्याकडून प्रत्येकी साडेआठ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर बसून पेपर लिहून ती उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत कोडिंग करून जमा केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्याची समुद्र वाणिज्य विभागाकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in