Ghatkopar pipe line burst : घाटकोपर असल्फामध्ये जलवाहिनी फुटून पाणीच पाणी...

लोक घरात झोपले असताना हि पाण्याची पाइपलाइन फुटली. त्याचा प्रवाह इतका होता की त्यात अनेक दुचाकी, आजूबाजूच्या घरांचे आणि दुकानांचे साहित्य वाहून गेले
pipe line burst
pipe line burstAdmin

घाटकोपरच्या असल्फा विभागात 72 इंची जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे मोठे फवारे दिसत आहेत. घाटकोपर येथील असल्फा विभागात ब्रिटिशकालीन 72 इंच जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झाली असल्याने जलवाहिनी फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यापूर्वीही जलवाहिनी फुटून घरांची अक्षरश: पडझड झाली होती. सध्या तरी ही पाण्याची लाईन फुटल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते. 30 डिसेंबरच्या रात्री मुंबईतील असल्फा भागात लोक घरात झोपले असताना हि पाण्याची पाइपलाइन फुटली. त्याचा प्रवाह इतका होता की त्यात अनेक दुचाकी, आजूबाजूच्या घरांचे आणि दुकानांचे साहित्य वाहून गेले आहे. या जलवाहिनीतून पाणी इतक्या वेगाने बाहेर आले की अनेक घरांमध्ये पाणी जाऊन, परिसर आणि रस्ते पाण्याखाली गेले. अचानक पाणी घरात आल्याने लोक घाबरले आणि गोंधळले. 

मिळालेल्या माहितीनुसार, या पाण्याचा दाब इतका जोरदार आहे की ते सुमारे 10 फुटांपर्यंत वाढत आहे. याबाबतची माहिती मुंबई महापालिकेला मध्यरात्री 2 ते 2.30 या वेळेत कळवण्यात आली, मात्र पालिकेचे अधिकारी उपस्थित नव्हते. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in