पालिका अभियंत्याच्या मारहाणीच्या निषेधार्थ भायखळा विभाग कार्यालयात आज आंदोलन

या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी ई विभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युनियनचे उपाध्यक्ष रमेश भुतेकर-देशमुख यांनी दिली.
पालिका अभियंत्याच्या मारहाणीच्या निषेधार्थ  
भायखळा विभाग कार्यालयात आज आंदोलन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छतेचा विविध ठिकाणच्या आढावा घेत असताना पालिकेच्या घनकचरा विभागाच्या अभियंत्याला एका कंत्राटदाराने मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भायखळा येथील पालिकेच्या ई विभाग कार्यालयासमोर सकाळी १० वाजता आंदोलन करण्याचा इशारा म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनने दिला आहे.

भायखळा ई विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक अभियंता रंजन चंद्रकांत बागवे यांना साफसफाईच्या कामामध्ये व्यत्यय आणून पे अॅण्ड पार्कचा कंत्राटदार एचआरएस एन्टरप्रायझेसचे अब्दुल अनवर शेख यांनी शिवीगाळ आणि जबर मारहाण केली. मारहाणीनंतर त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बागवे यांच्या कानाला गंभीर दुखापत होऊन त्यांना ऐकण्याची क्षमता कमी झालेली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत गुन्हा दाखल करण्यास स्थानिक ताडदेव पोलीस ठाणे टाळाटाळ करत आहे. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी ई विभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युनियनचे उपाध्यक्ष रमेश भुतेकर-देशमुख यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in