मुंबईतील काही भागात गुडघाभर पाणी साचू शकतं ; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबईतील काही भागात गुडघाभर पाणी साचू शकतं ; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
Published on

वातावरणीय बदल, कमी वेळात अधिक पाऊस त्यामुळे मुंबईतील काही भागात गुडघाभर पाणी साचू शकतं, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य यांनी केले. मुंबई महापालिका मुख्यालयात मंगळवारी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसह रस्ते कामाचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत आतापर्यंत ७५ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

पावसाळ्यात दरड कोसळण्याचा घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे दरडीच्या छायेत राहणाऱ्या रहिवाशांना पर्यायी घरे देण्याचा निर्णय पुढील एक दोन वर्षांत होईल, असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला. “नालेसफाई रस्त्याची कामे वेळत कशी होणार यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मी खोटं बोलणार नाही, काही ठिकाणी फ्लॅश फ्लडींग होते. त्यामुळे कमी वेळेत अधिक पाऊस पडला तर गुडघ्यापर्यंत पाणी काही काळ साचू शकते. अतिवृष्टी, ढगफुटी झाली तर कोणाच्या हातात परिस्थिती राहत नाही, मात्र तरीदेखील सर्वोत्तम यंत्रणा मुंबईकडे आहे,” असे आदित्य म्हणाले. पालिकेच्या सर्व वॉर्ड ऑफीसरांना पुढील १० दिवस रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या सूचना, मीडियाकडून दाखवण्यात आलेल्या बातम्या, सोशल मीडियावर आलेल्या तक्रारी याची दखल घेऊन कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in