भविष्यात कला, कौशल्य शिक्षणात गुंतवणूक गरजेची - डॉ. गगराणी; BMC शाळांतील विद्यार्थ्यांना कला प्रदर्शनाची संधी, सलाम बॉम्बे फाऊंडेशनचा उपक्रम

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांकडे अपार क्षमता आहे. सलाम बॉम्बे फाऊंडेशनसारख्या संस्था हे सिद्ध करतात की योग्य व्यासपीठ मिळाल्यास हे वि‌द्यार्थी पारंपरिक शिक्षणाच्या पुढे जाऊन विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात.
भविष्यात कला, कौशल्य शिक्षणात गुंतवणूक गरजेची - डॉ. गगराणी; BMC शाळांतील विद्यार्थ्यांना कला प्रदर्शनाची संधी, सलाम बॉम्बे 
फाऊंडेशनचा उपक्रम
Published on

मुंबई : मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांकडे अपार क्षमता आहे. सलाम बॉम्बे फाऊंडेशनसारख्या संस्था हे सिद्ध करतात की योग्य व्यासपीठ मिळाल्यास हे वि‌द्यार्थी पारंपरिक शिक्षणाच्या पुढे जाऊन विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला कला शिक्षण आणि कौशल्याधारित शिक्षणामध्ये सतत गुंतवणूक करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी केले.

सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या ‘कला का कारवाँ’ या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईतील महानगरपालिका व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या कला व मीडिया कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. त्यावेळी ते बोलत होते. वाय. बी. चव्हाण सभागृहात भरलेल्या या कार्यक्रमात चित्रकला, नृत्य, नाट्य आणि माध्यम कौशल्यांचा प्रभावी अनुभव प्रेक्षकांना मिळाला.

जी केवळ व्यावसायिक शिक्षण आणि सर्जनशीलतेवर भर देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासासाठी कला आणि संस्कृतीच्या प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते. या कार्यक्रमाने हे अधोरेखित केले की मुख्य शिक्षण पद्धतीमध्ये कला आणि मीडियाचा अंतर्भाव करणे किती महत्त्वपूर्ण आहे, असे सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष राजश्री कदम म्हणाल्या.

‘कला का कारवाँ’सारख्या कार्यक्रमातून निदर्शनास येते की, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण आणि संधी दिल्यास ते असामान्य यश मिळवू शकतात. आमची शिक्षण प्रणाली राष्ट्रीय शिक्षण धोरण अन्वये रचलेली आहे.

- राजश्री कदम, उपाध्यक्ष सलाम बॉम्बे फाऊंडेशन

logo
marathi.freepressjournal.in