भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सची ९५४ अंकांनी घसरण

भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सची ९५४ अंकांनी घसरण

३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ९५३.४० अंक किंवा १.६४ टक्का घसरुन ५७,१४५.२२वर बंद झाला

देशांतर्गत शेअर बाजार सोमवारी मोठ्या घसरणीसह उघडला. जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण आणि विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीचा मारा यामुळे भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकात सोमवारी सुमारे दोन टक्के घसरण झाले. सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण झाली.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ९५३.४० अंक किंवा १.६४ टक्का घसरुन ५७,१४५.२२वर बंद झाला. दिवसभरात तो १,०६०.६८ अंक किंवा १.८२ टक्का घसरुन ५७,०३८.२४ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ३११.०५ अंक किंवा १.८० टक्का घटून १७,०१६.३०वर बंद झाला.

बाजाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स सुमारे ८०० अंकांनी कोसळला. प्रारंभी सेन्सेक्स ८०९ अंकांनी घसरून ५७,२८९.९२ अंकांवर होता. त्याच वेळी, निफ्टी २२२ अंकांनी घसरून १७,०९२.५५वर होता. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी जागतिक बाजारातून देशांतर्गत बाजारासाठी नकारात्मक संकेत मिळाले.

सेन्सेक्सवर्गवारीत मारुती, टाटा स्टील, आयटीसी, बजाज फिनान्स, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा आणि इंडस‌्इंड बँक यांच्या समभागात घसरण झाली. तर एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, एशियन पेंटस‌्, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो आणि नेस्ले यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात सेऊल, टोकियो, शांघायमध्ये घसरण झाली. तर युरोपियन बाजारात दुपारपर्यंत नकारात्मक वातावरण होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.७५ टक्का घटून प्रति बॅरलचा दर ८५.५० अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारी २,८९९.६८ कोटींच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in