सेन्सेक्समध्ये ३३७ अंकांनी झाली घसरण

३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३३७.०६ अंक किंवा ०.५७ टक्का घसरुन ५९,११९.७२वर बंद झाला.
 सेन्सेक्समध्ये ३३७ अंकांनी झाली घसरण

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात घसरण झाली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊन सलग दुसऱ्या दिवशी निराशाजनक वातावरण होते. सेन्सेक्स ३३७ अंकांनी घसरला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३३७.०६ अंक किंवा ०.५७ टक्का घसरुन ५९,११९.७२वर बंद झाला. दिवसभरात तो ६२४ अंक किंवा १.०४ टक्के घटून ५८,८३२.७८ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ८८.५५ अंक किंवा ०.५० टक्का घसरण होऊन १७,६२९.८०वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व, आयसीआयसीआय बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या समभागात घसरण झाली. तर दुसरीकडे टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंटस‌्, मारुती सुझुकी आणि आयटीसी यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात गुरुवारी सेऊल, टोकियो, शांघायमध्ये घसरण तर युरोपियन बाजारात दुपारपर्यंत नकारात्मक वातावरण होते. अमेरिकन बाजारात बुधवारी घसरण झाली होती.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. २०२२च्या अखेरपर्यंत व्याजदर ४.४ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. तसेच पुढील दोन पॉलिसी बैठकीत १२५ अंकांनी व्याजदर वाढतील, असेही सांगितले जाते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.५५ टक्का वाढून प्रति बॅरलचा दर ९०.३२ अमेरिकन डॉलर झाले. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी दोन दिवसांच्या खरेदीनंतर बुधवारी ४६१.०४ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in