सोन्याच्या नावाने व्यापाऱ्याचे पाच लाख पळविले

एक किलो सोन्याचे बिस्कीट असून, त्यातील शंभर ग्रॅम सोने त्यांना कापून देतो, असे सांगितले
सोन्याच्या नावाने व्यापाऱ्याचे पाच लाख पळविले

मुंबई : सोने खरेदीच्या नावाने एका ज्वेलर्स व्यापाऱ्याकडील पाच लाख रुपयांची कॅश घेऊन पळून गेलेल्या चारपैकी एका आरोपीला गस्तीवर असलेल्या डी. एन नगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली तर पळून गेलेल्या तिघांचा पोलिसाकडून शोध सुरू आहे. मोहम्मद अल्ताफ मोहम्मद कागदी ऊर्फ शुभम असे या आरोपीचे नाव असून, पळून गेलेल्या तिघांमध्ये नदीम शमशुद्दीन धनसे, समीर आणि जेम्स यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. मनिष पूनमचंद शर्मा हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचे हिरा ज्वेलर्स नावाचे एक दुकान असून, शनिवारी त्यांच्या परिचित शुभम नावाच्या एका तरुणाने त्यांना फोन करुन त्याच्याकडे शंभर ग्रॅम वजनाचे सोने असून, त्याची त्याला विक्री करायची आहे, असे सांगून त्यांना अंधेरी रेल्वे स्थानकासमोरील मोती महल हॉटेलजवळ बोलाविले होते. त्यामुळे मनिष शर्मा हे त्यांचा मित्र आश्‍विन अमृतलाल जैनसोबत तिथे गेले होते. सायंकाळी साडेसात वाजता तिथे शुभम आला होता. त्याने त्याच्याकडे एक किलो सोन्याचे बिस्कीट असून, त्यातील शंभर ग्रॅम सोने त्यांना कापून देतो, असे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in