अंधेरी-मुलुंड येथील दोन अपघातात; दोघांचा मृत्यू

पादचाऱ्याचा होली स्पिरीट रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला
अंधेरी-मुलुंड येथील दोन अपघातात; दोघांचा मृत्यू

मुंबई : अंधेरी आणि मुलुंड येथील दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मृतांम्ये अवनिंद्र राघव विश्‍वकर्मा या तरुणासह एका अज्ञात ४५ वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. याप्रकरणी एमआयडीसी आणि नवघर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन तपास केला आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता अंधेरीतील एमआयडीसी, मॅक्सवेल कंपनीसमोर ४५ वर्षांच्या एक पादचारी रस्त्यावरुन जात होता. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका व्हॅगनार कारने त्याला धडक दिली होती. या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या या पादचाऱ्याचा होली स्पिरीट रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कारचा चालक चिराग नवीन लादे या २१ वर्षांच्या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. दुसऱ्या अपघातात अवनिंद्र विश्‍वकर्मा याचा मृत्यू झाला. ३१ ऑगस्टला तो त्याच्या बाईकवरुन ऐरोली ब्रिजवरुन जात होता. यावेळी एका अज्ञात वाहनाची धडक लागून तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर इंद्रावती रुग्णालयात उपचार सुरु होता. उपचारादरम्यान त्याचा १ सप्टेंबरला मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in