भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांचे वितरण रविंद्र नाट्यमंदिर करण्यात आले
भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांचे वितरण

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांचे वितरण रविंद्र नाट्यमंदिर करण्यात आले. सन २०२० सालचा पुरस्कार उषा मंगेशकर आणि २०२१ सालचा पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक देऊन गौरविण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, संस्कृतीकार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उषा मंगेशकर, पंडित हरिप्रसाद चोरसिया मीना, खडीकर,आदिनाथ मंगेशकर, अशोक पत्की, सोनू निगम,अनुप जलोटा,पंकज उदास, मयुरेश पै,कलावंत मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in