दिघा गाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण

खासदार राजन विचारे यांनी स्थानकात येणाऱ्या रेल्वेला थांबा देऊन मोटरमन यांचा सत्कार केला व दिघा गाव रेल्वे स्थानकातून गाडी पुढे रवाना केली
दिघा गाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण

मुंबई : दिघा गाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झाल्यानंतर प्रत्यक्षात दिघा रेल्वे स्थानकात ढोल ताश्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात शिवसैनिकांनी व दिघावासियांनी जल्लोष केला. त्यावेळी रेल्वेचे सहाय्यक रेल्वे प्रबंधक अखलख अहमद, मुख्य प्रकल्प अधिकारी बी के जहा, प्रकल्प अधिकारी आर एस पाल, डीसीएम अरुण कुमार तसेच रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

खासदार राजन विचारे यांनी स्थानकात येणाऱ्या रेल्वेला थांबा देऊन मोटरमन यांचा सत्कार केला व दिघा गाव रेल्वे स्थानकातून गाडी पुढे रवाना केली. खासदार राजन विचारे यांनी दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या निर्मिती करणाऱ्या रेल्वेच्या सर्व अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सत्कार करून त्यांचेही आभार मानले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in