राममंदिराचे उद‌्घाटन : विशेष ट्रेनने घडविणार दर्शन; मुंबई भाजपकडून घराघरात दीपोत्सव

पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष यांची बैठक २२ आणि २३ तारखेला दिल्लीला झाली. ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी मार्गदर्शन केले.
राममंदिराचे उद‌्घाटन : विशेष ट्रेनने घडविणार दर्शन; मुंबई भाजपकडून घराघरात दीपोत्सव
PM
Published on

मुंबई : भाजपने प्रत्यक्ष राम मंदिराची लढाई लढली. त्यामुळे तो आमच्यादृष्टीने दिवाळीचा दिवस आहे. या निमित्ताने मुंबईतील प्रत्येक वॉर्डात प्रमुख मंदिरामध्ये मिलन कार्यक्रम दाखवणे, उत्सव साजरा करणे असे कार्यक्रम होतील. मुंबईतील प्रत्येक वार्डातील दहा हजार घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव केला जाणार आहे. २२ जानेवारी नंतर प्रत्यक्ष राम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घ्यावं म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून एक विशेष ट्रेन करून सामान्य नागरिकांना भगवान रामाच्या दर्शनाला घेवुन जाणार आहोत अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येत्या २२ जानेवारी हा राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस प्रत्येक हिंदूचे स्वप्न पूर्ण होण्याचा आहे. हजारो वर्षांच्या युद्ध विराम देण्याचा आणि साधुसंतांच्या अपेक्षा पूर्तीचा दिवस आहे. विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते अशोक सिंघल यांच्या मेहनतीचे फळ दिसणारा दिवस आहे. संघ परिवाराने समाजाला जोडण्याचं परिश्रम केले त्याची सांगता आता होते आहे. ज्यावेळी सगळे लोक विरोध करत होते, यात्रा अडवत होते कारसेवकांवर गोळ्या घालत होते, अडवाणींना अटक करत होते. नरेंद्र मोदी, प्रमोद महाजन यांच्यावर कारवाई करत होते. कल्याण सिंग यांचे सरकार घालवत होते. त्यावेळी याची लढाई भारतीय जनता पक्ष लढल्याचे शेलार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात

पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष यांची बैठक २२ आणि २३ तारखेला दिल्लीला झाली. ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पक्षाच्या आगामी कार्यक्रमाबद्दल अवगत केले. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक राज्यांना केंद्रीय भाजपने सर्वसमावेशक कार्यक्रम दिला आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी त्याची अंमलबजावणी कशी करायची त्यासंबंधी बैठका घेतल्या जात आहेत. कोर कमिटी त्यानंतर निवडणूक संचालन समिती मुंबई स्तरावर स्थापन करून बैठका पूर्ण करून मुंबई पदाधिकाऱ्यांच्या वार्ड स्तरापर्यंत बैठक घेण्याचे लक्ष आम्ही पूर्ण करत आहोत.

logo
marathi.freepressjournal.in